Thursday, February 4, 2010

३१ जानेवारी, राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार वितरण..

          नमस्कार मंडळी,
३१ जानेवारी, कै. सौ. शशिताई आगाशे जयंती. मुलांच्याप्रती त्यांची माया स्मरणात राहावी म्हणून या स्मृतीदिनानीमित्ताने बालकांसाठी वांड्गमय लिहिणार्‍या साहित्यिकांचा सत्कार सोहळा. वर्षभरात सच्चे विद्यार्थी म्हणून स्वताहाला सिद्ध करणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच जागरूक पालकांचा सत्कार आठवतेय ना?
       सकाळचे १० वाजलेले, सायन्स लेबोर्टरी समोर उभारलेल्या भव्य स्टेज समोर शामियाण्यामधे भारत विद्यालयाचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, आमंत्रित पालक व पत्रकार बसलेले. राज्यस्तरावर देण्यात येणारा बालवान्ड्ग्मय पुरस्कार स्वीकारण्यासाठी सुप्रसिद्ध बालसाहित्यिक श्री अनंत भावे व प्रसिद्ध कवी व चित्रपट गीतकार  दासु वैद्य या बालसाहित्यिकांचा प्रवेश होतो आणि.... बैठे बैठे..... सावधान!!!
         "झुमकर हं गा रह है, आज स्वागतगान....." शाळेचा गीतमंच सर्वांचे स्वागत करतो. पाहुण्यांचे औपचारिक स्वागत झल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्कर्ष पुरस्कार, मेथोडीकल स्टुडण्ट, औल रौन्डर स्टुडण्ट असे विशेष पुरस्कार, विद्यार्थांनी निवडलेले आदर्श तसेच लोकप्रिय शिक्षक पुरस्कार आणि पालकांसाठी जागरूक पालक पुरस्कारांचे वितरण केले गेले. विद्यार्थांच्या साहित्याने नटलेला सृजन वार्षिकांक २०१० चे प्रकाशन झाले. त्यानंतर सौ सुधाताई कोरडे यांचे हस्ते अनंत भावे यांना तर हर्षवर्धन आगाशे यांचे हस्ते दासु वैद्य यांना राज्यस्तरिय बालसाहित्याचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कै. दिवाकरभैय्या आगाशे विधायक पत्रकारिता पुरस्कार राजेश डीदोळकर आणि नितीन सिर्साठ यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी दोन्ही मान्यवरांनी पुरस्कारची राशी शाळेलाच वेगवेगळ्या कारणांसाठी प्रदान केली. शिक्षक श्री शालिग्राम उन्हाले यांनी शाळेला १ लाख रुपये देणगी दिल्याबद्दल तर नरेंद्र लांजेवार यांना पुण्याचा राम आपटे स्मृति प्रबोधन पुरस्कार जाहीर झाळ्याबद्दल पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
          अनंत भावे सत्काराला उत्तर देतांना म्हणाले की "शालेय जीवनात सतत प्रश्न विचारत राहिल्यास अनेक प्रश्नांची उत्तरे ग्रंथ देतात. ग्रंथ आपल्याला घडवीतात म्हणून ग्रंथाकडून विविध प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजे. जो प्रश्न विचारेल त्यालाच यशाचा मार्ग सापडेल." दासु वैद्य यांनी विद्यार्थ्याना कवितेची जडन घडण सांगत "पुरस्कार म्हणजे शाबासकीची थाप असते" असे मत व्यक्ता करून विद्यार्थांशी खुसखुशीत संवाद साधला.
          कु. कोमल देशमुख व प्राची गायकवाड यांनी कार्यक्रमाचे साजेसे संचलन केले तर मुख्याध्यापक बी टी कुसूंबे यांनी आभार मानले.